

Team India
Sakal
New Zealand Set 301 Runs Target for India: रविवारी (११ जानेवारी) वडोदरामध्ये भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात पहिल्याच डावात दोन्ही संघात रोमांचक लढाई पाहायला मिळाली आहे.
न्यूझीलंडकडून सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स (Devon Conway & Henry Nicholls) यांच्या चांगल्या सुरुवातीनंतर भारताने सामन्यात पुनरागमन केले. मात्र नंतर डॅरिल मिचेलच्या (Daryl Mitchell) आक्रमणामुळे न्यूझीलंडने ३०० धावांचा टप्पा गाठला आणि भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले.