

Harshit Rana’s Double Strike Stuns New Zealand
Sakal
भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या वनडे मालिकेतील पहिला सामना बीसीए स्टेडियम, वडोदरा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी विक्रमी भागीदारी केली, पण हर्षित राणाच्या स्पेलने भारताला पुनरागमन करून दिले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स (Devon Conway & Henry Nicholls) यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला संयमी खेळ करत पॉवरप्लेची १० षटके खेळून काढली. त्यानंतर त्यांनी काही आक्रमक शॉट्स खेळले.