

Rinku Singh - Ishan Kishan
India vs New Zealand 1st T20I Playing XI: भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० मालिकेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांसाठी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी ही अंतिम तयारी असेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार मिचेल सँटेनरने (Mitchell Santner) नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ (Team India) प्रथम फलंदाजी करेल.