Team India
Sakal
Cricket
IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?
Sunil Gavaskar on Team India Defeat against NZ: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. ३७ वर्षात पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात वनडे मालिका जिंकली. यानंतर सुनील गावसकरांनी भारताच्या पराभवाचे कारण सांगितले.
Sunil Gavaskar on Team India lost ODI Series against New Zealand: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत २-१ अशा मानहानिकारक पराभवाला रविवारी (१८ जानेवारी) सामोरे जावे लागले.
इंदोरला झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडने ४१ धावांनी जिंकला. त्यामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिकाही जिंकली. भारतीय भूमिका वनडे मालिका जिंकण्याची ही न्यूझीलंडची पहिलीच वेळ होती.
मात्र भारतीय संघाला (Team India) घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गासकरांनीही (Sunil Gavaskar) तिखट शब्दात भारतीय संघाकडून कुठे चूक झाली हे दाखवून दिले आहे.

