IND vs NZ, 1st Test, 3rd Day: केएल राहुलचं शतक, तर कर्णधार गिल ९८ वर बाद! भारताची न्यूझीलंडवर भलीमोठी आघाडी

India vs New Zealand 1st Test, 3rd Day Report: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसाखेर मोठी आघाडी घेण्यात यश मिळवले आहे. भारताकडून केएल राहुलने शतक केले, तर कर्णधार शुभमन गिलचे शतक फक्त २ धावांनी हुकले.
KL Rahul - Shubman Gill | India vs New Zealand 1st Test

KL Rahul - Shubman Gill | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India, 1st Test, 3rd Day: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने ४८० धावांचा टप्पा ओलांडत ११८ धावांची मोठी आघाडी घेण्यात यश मिळवले आहे.

तिसऱ्या दिवशी केएल राहुलने शतक (KL Rahul Century) केले, पण कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याचे शतक थोडक्यात हुकले आहे. रिषभ पंतनेही (Rishabh Pant) चांगली फलंदाजी करत नाबाद अर्धशतक केले.

KL Rahul - Shubman Gill | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: केएल राहुलने १३६ धावा करत गावसकरांचा ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, पण गौतम गंभीरपासून एक रन दूर राहिला!
Loading content, please wait...