

India vs New Zealand 1st Test 5th Day morning session
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला पहिला कसोटी सामना सुरू असून सोमवारी (२३ नोव्हेंबर) या सामन्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भारतीय संघ मोठ्या आघाडीमुळे विजयासाठी प्रयत्न करत आहे, तर न्यूझीलंड सामना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सामन्याला रोमांचक वळण मिळाले असून आता केवळ दोन सत्राचा खेळ उरला आहे.
या दोन सत्रात भारताला न्यूझीलंडने आघाडी भरून काढण्यापूर्वी ६ विकेट्स घ्यायच्या आहेत, त्यामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर असला, तरी न्यूझीलंड दोन्ही सत्रात विकेट्स टिकवून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. लंचब्रेकपर्यंत भारताकडे अद्यापही १९५ धावांची आघाडी आहे.