

Mohammed Siraj - Ravindra Jadeja
Sakal
Mohammed Siraj React on Ravindra Jadeja's Form: भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (१८ जानेवारी) पार पडणार आहे. हा सामना मालिकेसाठी निर्णायक आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे.
अशात इंदोरला होणारा तिसरा सामना जो जिंकेल, तो मालिकाही जिंकले. त्यामुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण यासामन्यापूर्वी भारतीय संघाला अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) फॉर्मची चिंता आहे.