Ravindra jadejaesakal
Cricket
IND vs NZ 3rd Test : Ravindra Jadeja ची विक्रमी कामगिरी, न्यूझीलंडचा ६ जणं परतले घरी; झहीर खान, इशांत शर्माला सोडले माघारी
IND vs NZ Mumbai Test : भारतीय संघाने मुंबई कसोटीच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडला बॅकफूटवर फेकले आहे.
IND vs NZ 3rd Test Marathi update : भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाची पहिली दोन सत्र भारताच्या नावावर राहिली. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जसप्रीत बुमराहला पुरेशी विश्रांती मिळावी, याकरिता तिसऱ्या कसोटीतून त्याला वगळले गेले. त्याच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराज परतला. किवी कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय भारताच्या पथ्यावर पडल्याचे सध्यातरी दिसतेय. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja ) ३ विकेट्स घेऊन सामन्यात मोठा विक्रमाची नोंद केली. रवींद्रजने भारताचा महान जलदगती गोलंदाज झहीर खान व इशांत शर्मा यांचा विक्रम मोडला.

