

India vs New Zealand 5th ODI
Sakal
New Zealand vs India 5th ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चालू असलेल्या वनडे मालिकेतील अखेरचा आणि पाचवा सामना रविवारी (१५ नोव्हेंबर) माऊंट मौंगानुई येथे खेळवला जाणार आहे. हा सामना निर्णायक आहे.
सध्या भारतीय संघ मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी भारताकडे आहे, तर न्यूझीलंड मालकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
रविवारी होत असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरेल.