IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

INDIA U19 ASIA CUP VICTORY CELEBRATIONS: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने जिंकले. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभूत केले. या विजेतेपदानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले.
U19 Asia Cup 2026 | Team India Celebration

U19 Asia Cup 2026 | Team India Celebration

Sakal

Updated on: 

U19 Asia Cup, India vs Pakistan Final: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शनिवारी (१४ नोव्हेंबर) रोमांचक अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर १ विकेट राखून थरारक विजय मिळवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

खरंतर याआधी गेल्यावर्षी पाकिस्तानने भारताला पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया कप जिंकला होता. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेतही साखळी फेरीत भारताचा मोठा पराभव पाकिस्तानकडून झाला होता. त्यामुळे गेल्या दोन पराभवांमुळे शनिवारी होणाऱ्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष होते की भारतीय संघ या पराभवांची परतफेक करणार का? अखेर भारताने विजय मिळवत या पराभवांना मागे टाकले आहे.

U19 Asia Cup 2026 | Team India Celebration
IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?
Loading content, please wait...