

ishan Kishan - Arshdeep Singh | India vs New Zealand 5th T20I
Sakal
India vs New Zealand, 5th T20I Result: भारतीय संघाने तिरुअनंतपूरम येथे शनिवारी (३१ जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील पाचव्या सामन्यात ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली. भारताच्या विजयात इशान किशन, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांचे मोलाचे योगदान राहिले.
या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) २७२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकात २२५ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडसाठी फिन ऍलेनने चांगली झुंज दिली, पण अन्य फलंदाज फार काही करू शकले नाहीत.