

Team India
Sakal
India vs New Zealand 5th T20I Playing XI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळली जात आहे. हा सामना तिरुअनंतपूरम येथे खेळला जात आहे.
या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून भारताने मालिका विजय आधीच निश्चित केला आहे. पण न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ (Team India) सध्या ३-१ अशा फरकाने पुढे आहे. आता पाचवा सामना खेळवला जात आहे. हा सामना टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेपूर्वीचा दोन्ही संघांचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.