

Mitchell Santner
Sakal
Mitchell Santner on New Zealand Victory over India in 4th T20I: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात बुधवारी (२८ जानेवारी) ५० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडने व्हाईटवॉशचा धोकाही टाळला आहे. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयात कर्णधार मिचेल सँटेनरचाही मोठा वाटा होता.
त्याने या सामन्यात २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने संजू सॅमसन, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना बाद केले होते. दरम्यान, सामन्यानंतर सँटेनरने (Mitchell Santner) त्याच्या योजनांबद्दल भाष्य केले आहे. त्याच्या मते तो बचावात्मक गोलंदाजी करून फलंदाजांवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि विकेट्स घेतो.