NZ vs IND, Schedule: विराट अन् रोहितचा शेवटचा न्यूझीलंड दौरा? ५ वनडे, ५ टी२० आणि २ कसोटी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

India tour of New Zealand Full Timetable: भारतीय संघ यावर्षाच्या शेवटी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ वनडे, ५ टी२० आणि २ कसोटी सामने होणार आहेत. या मालिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
India tour of New Zealand 2026

Virat Kohli - Rohit Sharma

Sakal

Updated on

India Tour of New Zealand 2026: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने नुकतेच त्यांच्या मायदेशात या वर्षाच्या अखेरीस आणि पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महिला आणि पुरुष संघांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यात भारतीय पुरुष संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचाही समावेश आहे.

जवळपास दीड महिन्यांचा हा दौरा असून तिन्ही प्रकारातील मालिका या दौऱ्यात भारतीय संघ (Team India) न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. हा दौरा यावर्षी २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये २०१९ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामने खेळणार आहे, तसचे २०२२ नंतर पहिल्यांदाच वनडे आणि टी२० मालिका भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये खेळेल.

India tour of New Zealand 2026
IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com