Kane Williamson and Tom Latham created history during the Ireland vs New Zealand Test
Kane Williamson and Tom Latham world record: न्यूझीलंडचा कसोटी संघ एकमेव कसोटी सामन्यासाठी आयर्लंड दौऱ्यावर पोहोचला आहे आणि आजपासून त्या कसोटीला सुरुवातही झाली आहे. पण, या सामन्यात केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. १२ वेगवेगळ्या देशांमध्ये कसोटी सामना खेळणारे हे पहिले दोन खेळाडू बनले आहेत. सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब येथे आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झालेला हा एकमेव कसोटी सामना, विलियम्सन आणि लॅथम या दोघांसाठीही आयर्लंडमधील पहिलाच कसोटी सामना आहे.