

MOHAMMED SIRAJ
esakal
Mohammed Siraj, Sunil Gavaskar, R Ashwin: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. अशातच आता संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपापली भूमिका मांडली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला संधी न दिल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. आकाश दीपला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी सिराजला संधी देता आली असती, असं गावसकर यांचं मत आहे. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने प्रसिद्ध कृष्णाची निवड केली. त्यामुळे सिराजला पुन्हा एकदा संधी मिळाली नाही.