

India vs New Zealand Test Series
esakal
India vs New Zealand Test Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १९ नोव्हेंबरपासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. नुकताच भारतीय संघाने यजमान संघाविरुद्ध टी-२० मालिका आपल्या नावावर केली, तर एकदिवसीय मालिकाही जिंकली. आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
पहिला सामना जिंकण्याच्या इराद्याने गुरुवारी (१९ नोव्हेंबर) भारतीय संघ मैदानात उतरेल. मात्र, त्याआधी भारतीय संघाची चिंता एका विक्रमामुळे वाढली आहे. गेल्या ५८ वर्षांपासून हा विक्रम कायम आहे. तसेच पहिल्यांदाच परदेशात कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिल ही जबाबदारी सांभाळणार आहे.