

Team India Gold Medal at Asian Games 2026
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारती संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १९ धावांनी पराभवाचा धक्का दिला.
भारताने यापूर्वी २०२३ मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे यंदा क्रिकेट प्रकारात महिला आणि पुरुष दोन्ही गटातील सुवर्णपदक भारताला मिळाले आहे.
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला २० षटकात बाद धावाच करता आल्या आणि त्यामुळे पाकिस्तानला पराभवासह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यंदा श्रीलंका संघाला कांस्य पदक मिळाले. त्यांनी कांस्यपदकाच्या लढाईत बांगलादेशला पराभूत केले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.