IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

India vs Pakistan Asian Games 2026 match date: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट सामना पुन्हा पाहायला मिळू शकतो. जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत दोन्ही संघांचा पुरुष क्रिकेटमधील ड्रॉ निश्चित करण्यात आला आहे.
India vs Pakistan Asian Games 2026 match date

India vs Pakistan Asian Games 2026 match date

esakal

Updated on

IND vs PAK Asian Games 2026 cricket schedule: श्रेयस अय्यरचा संघ अफगाणिस्तानला चीतपट करून आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. आशियाई स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांना २४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे आणि भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळालेला आहे. या स्पर्धेत भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान हाही खेळणार आहे, परंतु त्यांना वेगळ्या गटात स्थान दिल्याने पहिल्या फेरीत तरी India vs Pakistan सामना होणे शक्य नाही. अशात हे संघ कधी व केव्हा भिडतील याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com