IND vs PAK: सामना झालाच नाही, तरी पाकिस्तानला मिळाली चॅम्पियनची ट्रॉफी; ब्लाइंड क्रिकेट फायनलनंतर नेमकं काय घडलं?

India vs Pakistan Blind Cricket Asia Cup 2026 Final Controversy: ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ चा भारत-पाकिस्तान अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, पाकिस्तानला एकमेव विजेता घोषित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंडने या निर्णयाला विरोध करत दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्याची मागणी केली आहे.
India vs Pakistan Blind Cricket Asia Cup 2026 Final Controversy

India vs Pakistan Blind Cricket Asia Cup 2026 Final Controversy

esakal

Updated on: 

India vs Pakistan Blind Cricket Asia Cup 2026 Final Controversy: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही सामना असो, त्याची चर्चा होतेच. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील सामना चर्चेत आला आहे. पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, त्यानंतर पाकिस्तानला विजेता घोषित करण्यात आले. या निर्णयावर भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड (CABI) ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानला एकमेव विजेता मानण्यास नकार दिला आहे.

Loading content, please wait...