Asia Cup 2025 matches in Dubai and Abu Dhabi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातले ताणलेले संबंध पाहता, उभय देशांमधील क्रिकेट सामन्यांना विरोध होताना दिसला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांनी पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याची काहीच गरज नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळेच मागील आठवड्यात WCL मधील IND vs PAK सामन्यातून भारतीय खेळाडूंनी माघार घेतली आणि मॅच रद्द करावी लागली. त्यामुळेच आशिया चषक स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट होतं. पण, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे.