From Pulwama to Pahalgam: Yet India Plays Pakistan in ICC Tournaments
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडायला हवेत,अशा भारतीयांच्या भावना होत्या. त्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, ही पण मागणी होती. त्यानंतर पुढील दोन वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या लढती झाल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, आशिया चषक या स्पर्धांमध्ये IND vs PAK लढतीला डिमांड असते आणि त्यामुळे सर्व भावना, दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या वेदना, जखमा विसरून आपण शेजाऱ्यांसोबत क्रिकेटचे सामने खेळतोय, पण का?