India vs Sri Lanka semi final Asian Games 2026 result
India vs Sri Lanka semi final Asian Games 2026 result : भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचा फडशा पाडला.. इशान किशनच्या ( Ishan Kishan) नाबाद ८० आणि वैभव सूर्यवंशीच्या ३८ धावांच्या जोरावर भारताने १६९ धावा उभ्या केल्या. गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर या धावा श्रीलंकेला रडवणाऱ्या ठरल्या. जसप्रीत बुमराह व अक्षर पटेल यांनी सुरुवातीलाच धक्के देत भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ४५ धावांत तंबूत पाठवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता सुवर्णपदकासाठी India vs Pakistan असा सामना रंगणार आहे.