IND vs PAK: मोहसीन नक्वींनी पाकिस्तान हरतंय लक्षात येताच केला पोबारा; गाडीत बसून पसार होतानाचा Video Viral

Mohsin Naqvi Leaving Stadium Mid IND vs PAK Match: भारताने टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले. पण सामना संपण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी स्टेडियममधून अचानक निघून गेले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
PCB Chief Mohsin Naqvi’s Early Exit  India vs Pakistan

PCB Chief Mohsin Naqvi’s Early Exit India vs Pakistan

Sakal

Updated on

PCB Chief Mohsin Naqvi’s Early Exit: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठमोठ्या बाता करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वींनी सामन्यादरम्यान मात्र अचानक काढता पाय घेतल्याचे दिसले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले.

भारताचा हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. त्यामुळे भारताने सुपर ८ फेरीचेही तिकीट मिळवले आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापर्यंत हा सामना होईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते. पाकिस्तानने बहिष्काराचा निर्णय घेतला होता, पण नंतर आयसीसीसोबतच्या (ICC) बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे रविवारी हा सामना अखेर नियोजित वेळेत पार पडला.

<div class="paragraphs"><p>PCB Chief Mohsin Naqvi’s Early Exit  India vs Pakistan</p></div>
Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com