

Rohit Sharma meets Wasim Akram
Sakal
Rohit Sharma meets Wasim Akram: हस्तांदोलन न करण्याच्या कारणाने भारतीय क्रिकेट संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला रविवारी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या कृतीतून उत्तर दिले आहे. रविवारी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने-सामने होते.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यासाठी रोहित शर्मा टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर (T20 World Cup Brand Ambassador) म्हणून स्टेडियममध्ये उपस्थित होता. यावेळी तो याच भूमिकेतून सर्वांना भेटला. त्यामुळे त्याने सामन्यापूर्वी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमसोबतची (Wasim Akram) गळाभेट घेतली, जी चर्चेचा विषय ठरली.