India and Pakistan could meet again in T20 World Cup 2026
esakal
Possible Date and Scenario for India vs Pakistan Rematch : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. या सामन्याची जेवढी हवा केली गेली, त्यातुलनेत हा सामना एकतर्फीच झाला. कोलंबो येथे लढत होण्याचा पाकिस्तानला सर्वाधिक फायदा होईल, अशा वावड्या उठवल्या गेल्या, परंतु सूर्यकुमार यादवचा संघ पाकड्यांना पुरून उरला. भारताने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून Super 8s मध्ये आपले स्थान पक्के केले. पाकिस्तानला शेवटच्या लढतीत विजय मिळवून पुढील फेरी गाठता येणार आहे. तसे झाले, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पुन्हा पाहायला मिळू शकतो.