

India vs Pakistan
Sakal
क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा दिवस पर्वणी असणार आहे, कारण टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने असणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जेव्हाही मैदानात होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात रोमांच आणि उत्सुकता दिसून येते. चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहचलेली असते.
त्यातही गेल्या काही वर्षात दोन देशांमधील बदललेल्या संबंधांचा परिणाम मैदानावरही दिसत आहे, त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट जगताचे लक्ष असते. दरम्यान लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रविवारी केवळ एक नाही, तर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असे दोन क्रिकेटचे सामने होणार आहेत.