U19 World Cup, IND vs PAK: भारताला आशिया कपच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी, पाकिस्तानविरुद्धचा Live मॅच कुठे पाहाणार?

U19 World Cup, India vs Pakistan Live Streaming: भारत आणि पाकिस्तान युवा संघ १९ वर्षांखालीला वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी आमने-सामने असणार आहेत. हा सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या.
India vs Pakistan | U19 World Cup

India vs Pakistan | U19 World Cup

Sakal

Updated on

Where to Watch IND vs PAK, U19 World Cup 2026? : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीचा अखेरचा सामना रविवारी (१ फेब्रुवारी) पार पडणार आहे. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात खेळवला जाणार आहे.

बुलावायो येथे हा सामना होणार असून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीतील तीन संघ आधीच निश्चित झाले आहेत, मात्र चौथा संघ रविवारच्या सामन्यानंतर निश्चित होणार आहे.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan | U19 World Cup</p></div>
U19 World Cup: भारताविरुद्ध जिंका, नाहीतर गाशा गुंडाळा, पाकिस्तानसमोर 'करो वा मरो'ची परिस्थिती; जाणून घ्या समीकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com