

U19 India vs Pakistan
Sakal
India vs Pakistan U19 WC Qualification Scenarios: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू असून आता अखेरच्या टप्पा सुरू होणार आहे. सध्या सुपर सिक्स फेरी सुरू असून या फेरीतून अंतिम ४ संघ निश्चित होणार आहेत. या फेरीत १२ संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. या दोन गटातून प्रत्येकी २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
यातील अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे, तर ब गटातून इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. आता उपांत्य फेरीसाठी केवळ एक जागा शिल्लक असून भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात त्यासाठी चूरस आहे. त्यामुळे रविवारी (१ फेब्रुवारी) होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.