
India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला ३० नोव्हेंबरपासून प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हा सामना कॅनबरामधील मनुका ओव्हल स्टेडियमवर होत आहे. मात्र या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवसावर पावसाचं पाणी पडलं आहे.
कॅनबरामध्ये सातत्याने कोसळलेल्या पावसांच्या सरीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरूच झाला नाही. या सराव सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. हा सराव सामना दिवस-रात्र खेळवला जाणार असल्याने गुलाबी चेंडू वापरण्यात येणार होता.