
Australia vs India Test Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवातही भारताने ऑस्ट्रेलियाला पर्थ कसोटीत २९५ धावांनी पराभूत करत दमदार केली. भारताच्या या विजयात युवा यशस्वी जैस्वालनेही मोलाचा वाटा उचलला होता. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली होती.
आता त्याला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम खुणावत आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर महिन्यात होणाऱ्या तीन सामन्यातच सचिनचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. हा विक्रम म्हणजे एकाच वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा.