India vs South Africa T20I 2025 full schedule and venues
esakal
How to watch India vs South Africa T20 match for free : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिकेची आता सर्वांना उत्सुकता आहे. टेंबा बवुमाच्या संघाने कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडियाने वन डे मालिका जिंकून हिशोब बरोबर केला आहे. त्यामुळे आता ट्वेंटी-२० मालिकेत कोण बाजी मारून वरचढ ठरतं, हे पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. या मालिकेत भारतीय संघात हार्दिक पांड्या, शुभमन गिल यांचे पुनरागमन होणार आहे. आफ्रिकेच्या संघाला मालिकेपूर्वीच दुखापतीचे ग्रहण लागले आहे आणि त्यामुळे त्यांच्या ताफ्यात बदल दिसणार आहे.