

India vs South Africa
sakal
कोलकाता : मागील पाच प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये चार शतके झळकावणारा ध्रुव जुरेल याचा भारतीय कसोटी संघातील समावेश निश्चित आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये येत्या शुक्रवारपासून (ता. १४) कोलकातामध्ये पहिल्या कसोटीला सामन्याला सुरुवात होत असून, याप्रसंगी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे यांनी बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नितीशकुमार रेड्डी याच्याऐवजी ध्रुव जुरेलला संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.