IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Sri Lanka vs India, 2nd Test Draw: भारत आणि श्रीलंका संघात कोलंबोमध्ये दुसरा कसोटी सामना झाला. हा सामना पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला आहे. श्रीलंका संघाकडून पाचव्या दिवशी सोनल दिनूशा आणि तळातल्या फलंदाजांनी दिलेल्या झुंजीमुळे त्यांनी व्हाईटवॉश टाळला.
Team India | Sri Lanka vs India 2nd Test

Team India | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत संघात कोलंबोमध्ये रंगतदार सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने अनेक प्रयत्नांनंतरही श्रीलंका संघाला शेवटच्या दिवशी सर्वबाद करता आले नाही.

आधी पसिंगू सुरियाबंदाराच्या अर्धशतकी आणि नंतर सोनल दिनूशाच्या शतकी खेळीमुळे त्यामुळे अखेर हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका १-० अशा फरकाने जिंकली.

मात्र श्रीलंकेने व्हाईटवॉश टाळला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीचा भाग असल्याने याचा परिणाम दोन्ही संघांवर झाला असून भारतीय संघाने फॉलोऑन दिल्यानंतरही सामना न जिंकल्याने पुढे जाण्याची संधी गमावली.

Team India | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com