IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

Shubman Gill Catch: भारत आणि श्रीलंका संघात सुरू असलेल्या कोलंबो कसोटीत चौथ्या दिवशी शुभमन गिलने मस्त झेल घेतला होता. त्याच्या झेलाने भारताला पुनरागमन करून दिलं.
Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test

Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या कोलंबो कसोटीत शुभमन गिलने चौथ्या दिवशी भन्नाट झेल घेत सर्वांचेच लक्ष वेधले. या सामन्यात भारतीय संघाने (Team India)चौथ्या दिवशी श्रीलंका संघाला फॉलोऑन दिला होता.

त्यानंतरही श्रीलंकेने पसिंदू सुरियाबंदारा (Pasindu Sooriyabandara) आणि कामिंदू मेंडिस (Kamindu Mendis) यांच्या शतकी भागीदारीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण गिलने (Shubman Gill) घेतलेल्या झेलाने भारताचे सामन्यात पुनरागमन झाले.

Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com