

Devdutt Padikkal - Rishabh Pant | Sri Lanka vs India 1st Test
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Marathi News: भारत आणि श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉलमध्ये खेळवला जात असून मंगळवारी या सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने या सामन्याच्या पहिल्या तिन्ही दिवशी वर्चस्व ठेवले होते.
मात्र चौथ्या दिवशी श्रीलंकन गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना पहिल्या दोन सत्रातच भारताचा डाव संपवला आहे. मात्र पहिल्या डावातील १७८ धावांच्या आघाडीमुळे आणि रिषभ पंत व देवदत्त पडिक्कलने केलेल्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.