India tour of Sri Lanka 2026 Test schedule
esakal
India tour of Sri Lanka Test schedule: भारतीय संघाने घरच्या मैदानावर नुकतीच पार पडलेली अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी जिंकली. आता भारताची पुढील कसोटी मालिका थेट ऑगस्टमध्ये होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) फायनलमध्ये पोहोचण्याची भारताला अजून संधी आहे आणि त्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर पुढील कसोटी मालिका थेट डिसेंबर २०२६ मध्ये होणार आहे.