

IND vs SL Test Series 2026
esakal
IND vs SL Test Series 2026: भारतीय संघाने नुकताच श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात दणक्यात विजय मिळवला आहे. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध झालेला तीन दिवसीय सराव सामना भारतीय संघाने ६ विकेट्सने आपल्या खिशात घातला.
भारतीय संघाला १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27) साठी महत्त्वाची मानली जात आहे.