

Ravindra Jadeja - KL Rahul
Sakal
India vs Sri Lanka Test Cricket Record: भारतीय कसोटी संध सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. ४ ऑगस्ट रोजी भारतीय संघ कोलंबोमध्ये दाखल झाला आहे. आता १५ ऑगस्टपासून भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याआधी शुक्रवारपासून (८ ऑगस्ट) श्रीलंकन इलेव्हनविरुद्ध सराव सामना रंगणार आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. कारण ही मालिका WTC 2025-27 स्पर्धेचा भाग आहे.