

India Test Team
Sakal
IND vs SL 2026 Warm-Up Match Updates: भारत-श्रीलंका यांच्यामध्ये येत्या १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी शुक्रवारपासून (ता. ७) भारत-श्रीलंकन इलेव्हन संघ यांच्यामध्ये तीनदिवसीय सराव सामना खेळवण्यात येणार आहे.
याप्रसंगी भारतीय संघातील फलंदाज कसोटी मालिकेआधी होत असलेल्या सराव सामन्यात फिरकी गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाजांचा कस लागला.