

India vs West Indies
Sakal
INDIA VS WEST INDIES ODI & T20I 2026, LIVE STREAMING DETAILS: भारताचा संघ पुढच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात तीन वनडे आणि पाच टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. २७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत.
शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात भारताचा वनडे संघ खेळेल, तर आशियाई क्रीडा स्पर्धेतून परतल्यानंतर श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात भारताचा टी२० संघ खेळणार आहे. वेस्ट इंडिजचे वनडे आणि टी२० या दोन्ही मालिकेत शाय होप (Shai Hope) कर्णधारपद सांभाळणार आहे.