

Anshul Kamboj Debut | India vs West Indies 3rd ODI
Sakal
India vs West Indies 3rd ODI, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना न्यू चंदिगढला शनिवारी (३ ऑक्टोबर) खेळला जात आहे. ही मालिका भारताने पहिले दोन सामने जिंकून आधीच खिशात खातली आहे.
दुसऱ्या सामन्यात तर भारताने सर्वात मोठे लक्ष्य पार करण्याचा कारनामा केला. कर्णधार शुभमन गिलने द्विशतक करण्याचा पराक्रम गाजवला होता. आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजही प्रतिष्ठा राखण्याच्या हेतून मैदानात उतरत आहे.