IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

WASHINGTON SUNDAR OUT OF INDIA T20 SQUAD :वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी टीम इंडियाला आणखी एक मोठा बदल करावा लागला आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे नव्हे, तर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी टी-२० संघातून बाहेर करण्यात आलं.
WASHINGTON SUNDAR OUT OF INDIA T20 SQUAD

WASHINGTON SUNDAR OUT OF INDIA T20 SQUAD

esakal

Updated on: 

WASHINGTON SUNDAR OUT OF INDIA T20 SQUAD VS WEST INDIES: भारतीय संघाला सध्या दुखापतीची नजर लागली आहे आणि काही केल्या ही नजर उतरताना दिसत नाहीये. आजच्या दिवसात भारतासाठी दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. सुरुवातीला बातमी आली की प्रसिद्ध कृष्णाने दुखापतीमुळे तिसऱ्या वन डेतून माघार घेतली आहे आणि आता आणखी एक बातमी भारतीय संघासाठी समोर आली आहे.

वॉशिंग्टन सुंदरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर करण्यात आलं आहे. मात्र, वॉशिंग्टनला दुखापत झाल्यामुळे नाही, तर आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com