

India vs West Indies 3rd T20I
Sakal
India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध इंदोरला झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात १४ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयामुळे ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), प्रिन्स यादव (Prince Yadav) यांनी मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारताने २२४ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० षटकात ७ बाद २०९ धावा करता आल्या.