

India vs West Indies 5th T20I
Sakal
India vs West Indies 5th T20I Match: टी-२० विश्वकरंडक विजेतेपदाचा लौकिक पणाला लागलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना आज (शनिवारी, १७ ऑक्टोबर) होत असून, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या बॅकफूटवर आहे.
वेस्ट इंडीजने भारतात २००२ नंतर कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका जिंकलेली नाही, मात्र आता वेस्ट इंडीजचा संघ भारताविरुद्धची टी-२० मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी आणि फलंदाजांची बेजबाबदार फटकेबाजी याला कारणीभूत ठरली आहे. आजच्या निर्णायक सामन्यात या चुका कितपत सुधारल्या जातात, यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असेल. शे होपचा तडाखा