T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

India's Predicted Playing XI: भारतीय संघ टी२० वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध करो वा मरो सामना खेळणार आहे. या सामन्यातून संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचे पुनरागमन होऊ शकते. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, जाणून घ्या.
 India’s predicted playing XI

India’s predicted playing XI

Sakal

Updated on

India's Predicted Playing XI against Zimbabwe: भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सुपर-८ मधील दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध गुरुवारी (२६ फेब्रुवारी) सामना खेळायचा आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हा सामना भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) या दोन्ही संघांसाठी करो वा मरो असणार आहे. कारण हा सामना पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे.

<div class="paragraphs"><p> India’s predicted playing XI</p></div>
IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com