

INDIA BEAT ZIMBABWE BY 121 RUNS
esakal
INDIA BEAT ZIMBABWE BY 121 RUNS: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमध्ये वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय महिला संघाने १२१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताकडून हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी शतके झळकावली, तर गोलंदाजीत वैष्णवी शर्माने चार विकेट्स घेतल्या.