
India vs West Indies Women ODI and T20I Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (१३ डिसेंबर) भारतीय महिला संघाची आगामी वनडे आणि टी२० मालिकांसाठी घोषणा केली आहे. भारतीय महिला संघाला १५ डिसेंबरपासून वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध मायदेशात ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.
भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून वनडे मालिका खेळून परतला आहे. या वनडे मालिकेत भारताला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला.
या पराभवानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकांसाठी भारताच्या संघात मोठे बदल झाले आहेत.