

India Women March Into Semi-Finals | Asian Games
Sakal
Asian Games 2026, India into Semifinal: जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटला सुरुवात झाली असून महिलांची स्पर्धा आधी होत आहे. शुक्रवारी भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत काहीही निकाल लागला तरी २२ सप्टेंबर रोजी भारतीय संघ पदकासाठी खेळणार, हे निश्चित झाले आहे. कारण जर २० सप्टेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ सुवर्णपदकासाठी खेळणार आहेत, तर पराभूत होणारे संघ कांस्य पदकासाठी लढतील. पदकासाठीच्या लढती २२ सप्टेंबरला होणार आहेत.