

India Women Cricket Team
Sakal
India Women’s squad for ODI & T20I series against Australia : भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी२० आणि १ दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. हा भारतीय महिला संघाचा वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा पहिलाच परदेशी दौरा असेल.
सध्या भारतात वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेनंतर लगेचच भारतीय महिला खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी (India's Tour of Australia) रवाना होतील. आता या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची (India Women's Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे.